९
१ तेव्हा यरूब्बालाचा पुत्र अबीमेलेख, याने शखेमास आपल्या आईच्या भावांजवळ जाऊन त्यांस आणि आपल्या आईच्या बापाच्या घराण्यांतल्या सर्व परिवाराला असें सांगितलें कीं, २ ''तुम्ही कृपेकरून शखेमांतल्या सर्व माणसांच्या कानीं बोला, यरूब्बालाचे सर्व पुत्र सत्तर माणसें यानीं तुम्हावर अधिकार करावा, किंवा एका माणसाने तुम्हावर अधिकार करावा, यांतून तुम्हास कोणतें बरें?' आणि तुम्ही ती आठवण करा कीं मी तुमच्या हाडाचा व तुमच्या मासाचा आहें.'' ३ तेव्हा त्याच्या आईच्या भावानी त्याविषयीं त्या अवघ्या गोष्टी शखेमांतल्या सर्व माणसांच्या कानीं सांगितल्या, आणि त्याचें मन अबीमेलेखाकडे वळलें, कां तर त्यानी म्हटलें, 'तो आमचा भाऊ आहें. ४ आणि त्यानी त्याला बरीथ स्वामीच्या देवळांतून सत्तर शेकेल रूपें दिल्हें, आणि अबीमेलेखाने त्यावरून रिकामीं व लुच्चीं माणसें मजुरीने ठेविलीं; यास्तव तीं त्याच्यामागें चाललीं. ५ मग त्याने अफ-यास आपल्या बापाच्या घरीं येऊन आपले भाऊ यरूब्बालाचे पुत्र असीं सत्तर माणसें एका शिलेवर मारिलीं; तरी यरूब्बालाचा धाकटा पुत्र योथाम राहिला, कां तर तो लपलेला होता. ६ मग शखेमांतलीं सर्व माणसें व मिल्लो वस्तींतले सर्व वानी मिळून जाऊन शखेमांत खो एलोन खांब त्याजवळ अबीमेलेख राजा असा करून घेतला. ७ नंतर लोकानी योथामाला कळविलें, तेव्हा तो गरिज्जीम डोंगराच्या शिखरावर जाऊन उभा राहिला, आणि आपला स्वर उंच करून त्यांस हक मारीत बोलला, “ अहोशेमांनलीं माणसें, देवाने तुमचें ऐकावें म्हणून तुझी माझें ऐका. ८ झाडें आपल्यावर अभिषेकाने राजा करायास निघून गेलीं; तेव्हां त्यांनी जैतुनाला सांगितलें, ' तूं आमच्या राजा हो.' ९ तेव्हां जैतुनाने त्यांस म्हटलें, 'माझें तेलकटपण जेणेकरून माझ्याने देवाचा व माणसाचा सन्मान करितात, तें मी सोडून झाडांवर अधिकार करायास जावें कीं काय?' १० नंतर त्या झाडानी अंजिराला म्हटलें, 'तूं चल, आमचा राजा हो.' ११ तेव्हां अंजिराने त्यांस म्हटलें, 'म्या आपली गोडी व आपलें चांगलें उत्पन्न सोडून झाडांवर अधिकार कारायास जावें कीं काय?'' १२ नंतर त्या झाडानी द्राक्षवेलाला म्हटलें, 'तूं चल, आमचा राजा हो.' १३ तेव्हां द्राक्षवेलाने त्यांस म्हटलें, 'म्या आपला ताजा रस जो देवाला व मनुष्यांस संतुष्ट करितो, तो सोडून झाडावर अधिकार करायास जावें कीं काय?' १४ नंतर त्या सर्व झाडानी कांटेझुडपाला म्हटलें, 'तूं चल, आमचां राजा हो.' १५ तेव्हां कांटेझुडपाने त्या झाडांस म्हटलें, 'जर तुम्ही खरेपणाने मला अभिषेक करून राजा करितां, तर येऊन माझ्या छायेंत स्वस्थ राहा; नाहीं त कांटेझुडपांतून विंस्तू निघून लबानोनावरल्या गंधसुरूंस जाळून टाकील.' १६ यास्तव आता जर तुम्ही खरेपणाने व शुध्दपणाने वर्त्तणूक करून अबीमेलेख राजा केला आहे, आणि यरूब्बालासीं व त्याच्या घराण्यासीं जर तुम्ही बरें केलें आहे, आणि जर त्याच्या हातांच्या उपकाराप्रमाणें त्यासीं केलें आहे. १७ कां कीं माझ्या बापाने तुमच्यासाठीं लढाई केली; आपला जीव देखील पुढें ठेविला, आणि तुम्हाल मिद्दाच्या हातांतून सोडविलें. १८ परंतु तुम्ही आज बापाच्या घरावर उठलां, आणि त्याचे पुत्र सत्तर माणसें, यांस तुम्ही एका शिळेवर जिवें मारिलें, आणि त्याच्या दासीचा पुत्र अबीमेलेख याला शखेमांतल्या माणसांवर राजा करून ठेविलें, कां तर तो तुमचा भाऊ आहे.) १९ तर तुम्ही आजच्या दिवसीं यरूब्बालाविषयीं व त्याच्या घराण्याविषयीं खरेपणाने व शुध्दपणाने जर वर्त्तणूक केली आहे, तर अबीमेलेखावर संतोष करा; त्यानेहि तुम्हावर संतोष करावा. २० परंतु जर तसें नाहीं, तर अबीमेलेखांतून विस्तु निघून शखेमांतल्या माणसांस व मिल्ली वस्तीला जाळून टाको, आणि शखेमांतल्या माणसांतून व मिल्लो वस्तींतून विस्तू विघून अबीमेलेखाला जाळून टाको.'' २१ नंतर योथाम आपला भाऊ अबीमेलेख यासमोरून धांवत पळाला, आणि बेरास जाऊन तेथें राहिला. २२ तेव्हां अबीमेलेखाने इस्त्राएलावर तीन वर्षे अधिकार केला. २३ नंतर देवाने अबीमेलेख व शखेमांतलीं माणसें यांमध्यें दुष्ट स्वभाव लाविला, यास्तव शखेमांतल्या माणसानी अबीमेलेखासीं दगा केला; २४ तेणेकरून यरूब्बालाच्या सत्तर पुत्रांवर केलेला बळात्कार व त्यांचा रक्तपात त्यांचा भाऊ अबीमेलेख यावर जाऊन बसावा; कां कीं त्याने त्यांस जिवें मारिलें, आणि शखेमांतल्या माणसांवरहि बसावा; कां कीं त्याचे भाऊ मारायासाठीं त्यानी त्याला सहाय केलें. २५ नंतर शखेमांतल्या माणसानी त्याच्यासाठीं डोंगरांच्या शिखरावर दबाधारी ठेविले, आणि त्यानी आपल्याजवळून जो कोणी वाटेवर चालला, त्याला लुटिलें; आणि हें कोणी अबीमेलेखाला सांगितलें. २६ मग एबेदाचा पुत्र गाल आपल्या भावांसुध्दा आला, आणि ते शखेमांत आल्यानंतर शखेमांतल्या माणसानी त्यावर विश्वास ठेविला. २७ तेंव्हा त्यानी शेतांत जाऊन आपल्या द्राक्षमळ्यांची खुडणी करून द्राक्षांचें तुडविणें केलें, आणि ते उत्साह करीत आपल्या देवाच्या घरीं गेले, आणि खाऊन पिऊन अबीमेलेखाला शाप दिल्हा. २८ तेव्हां एबेदाचा पुत्र गाल बोलला, ''अबीमेलेख कोण? आणि त्याचा कारभारी जबुल कीं नाहीं? शखेमाचा बाप हमोर, याच्या माणसांची सेवा तुम्ही करा; आम्ही अबीमेलेखाची सेवा तर कशासाठीं करूं? २९ आणि हे लोक माझ्या हातीं असते तर किती बरें होतें! म्हणजे म्या अबीमेलेखाला काढून टाकिलें असतें.'' तर त्याने अबीमेलेखाला सांगितलें, ''तूं आपलें सैन्य वाढवून बाहेर ये.'' ३० त्या वेळेस त्यां नगराचा अधिकारी जबुल याने एबेदाचा पुत्र गाल याच्या गोष्टी ऐकिल्या, यास्तव त्याचा राग पेटला. ३१ मग त्याने कपट करून अबीमेलेखाजवळ दूत पाठवून असें सांगितलें कीं, ''पाहा, एबेदाचा पुत्र गाला आपल्या भावांसुध्दां शखेमास आला आहे; आणि पाहा, ते तुझ्यापुढें नगराची बंदोबस्ती करितात. ३२ तर आतां तूं आपल्या जवळच्या लोकांसुध्दा रात्रीं उठून शेतांत दबा धर. ३३ मग असें व्हावें कीं सकाळीं सूर्य उगवतांच तूं उठून नगरावर घाला घाल; मग पाहा, तो आपल्या जवळच्या लोकांसुध्दां तुझ्याजवळ बाहेर येईल, तेव्हां जसें तुझ्या हातीं येईल तसें तूं त्याचें कर.'' ३४ यास्तव अबीमेलेखाने आपल्याजवळच्या सर्व लोकांसुध्दां रात्रीं उठून चार टोळ्या करुन शखेमावर दबा धरिला. ३५ मग एबेदाचा पुत्र गाल, बाहेर येऊन नगराच्या वेसीजवळ उभा राहिला, आणि अबीमेलेख आपल्याजवळच्या लोकांसुध्दां दबा सोडून उठला. ३६ तेव्हां गालाने त्या लोकांस पाहून जबुलाला म्हटलें, ''पाहा, लोकं डोंगरांच्या शिखरांवरून उतरतात.'' मग जबुल त्यास बोलला, तुला डोंगराची छाया मनुष्यांसारिखी दिसती.'' ३७ तेव्हां गालाने फिरून असें म्हटलें कीं, ''पाहा, देशाच्या उंचोट्यावरून लोक उतरतात; आणि एक टोळी मौननीमाच्या वाटेवरून येत आहे.'' ३८ मग जबुल त्याला बोलला, ''तूं आपल्या ज्या तोंडाने बोललास, 'अबीमेलेख कोण कीं आम्ही त्याची चाकरी करावी' तें आतां कोठें आहे? ज्या लोकांस त्वां तुच्छ केलें, ते हेच कीं नाहींत? आतां मी मागतों, तूं बाहेर जाऊन त्यांसीं लढाऊ कर.'' ३९ मग गालाने शखेमांतल्या माणसांपुढें होऊन, बाहेर जाऊन अबीमेलेखासीं लढाई केली. ४० तेव्हा अबीमेलेख त्याच्या पाठीस लागला असतां तो त्याच्यापुढून पळाला, आणि वेसीच्या दारापर्यंत बहुत लोक मारलेले होऊन पडले. ४१ मग अबीमेलेख आरूम्यांत राहिला, आणि गालाने व त्याच्या भावानी शखेमांत न राहावें म्हणून जबुलाने त्यांस घालविलें. ४२ नंतर पुढल्या दिवसीं असें झालें कीं लोक बाहेरल्या शेतांत जाते झाले, आणि हें अबीमेलेखाला कोणी सांगितलें; ४३ तेव्हा त्याने लोक मिळवून त्यांच्या तीन टोळ्या केल्या; मग शेतांत दबा धरिला, आणि त्याने न्याहाळिलें; तर पाहा लोक नगरांतून बाहेर आले होते, तेव्हां त्याने त्यांवर घाला घालून त्यांस मारिलें. ४४ त्या वेळेस अबीमेलेख आणि त्याच्यासंगतीं जी टोळी, ती घाला घालून नगराच्या वेसीजवळ उभी राहिला, आणि दुस-या दोन टोळ्यानी शेतांत जे सर्व, त्यांवर घाला घालून त्यांस मारिलें. ४५ अबीमेलेखाने तर त्या सगळ्या दिवसांत नगरासीं लढाई केली, आणि त्याने नगर घेतलें व त्यांत, जे लोक त्यांस जिवें मारिलें, आणि नगर फोडून त्यावर मीठ पेरून टाकिलें. ४६ तेव्हा शखेमाच्या बुरजांतल्या सर्व माणसानी ऐकिलें, आणि ते खरीथ देवाच्या घरावरल्या पाह-याच्या माडीवर गेले. ४७ मग शखेमाच्या बुरजांतलीं सर्व माणसें एकवट झालीं आहेत, असें अबीमेलेखाला कोणी सांगितलें. ४८ तेव्हां अबीमेलेख आपल्याजवळच्या सर्व लोकांसुध्दां जालमोन डोंगरावर गेला, आणि अबीमेलेखाने आपल्या हातीं कु-हाडी घेऊन झाडांची फांदी तोडिली, मग तिला आपल्या खांद्दावर उचलून घेऊन त्याने आपल्या जवळच्या लोकांस सांगितलें, ''जें म्या केलें तें तुम्ही पाहिलें, तें माझ्यासारिखें लवकर करा.'' ४९ तेव्हां सर्व लोकांतल्या एकएकानेहि फांदी तोडून घेतली, आणि ते अबीमेलेखाच्यामागें चालले; मग त्यानी पाह-याच्या माडीवर त्या घालून, ते लोक आंत असतां पाह-याच्या माडीला आग लाविली; असीं शखेमाच्या बुरजांतलींहि सर्व माणसें, पुरूष व स्त्रिया सुमारें एक हजार, इतकीं मेली. ५० नंतर अबीमेलेख थेबेजास गेला, आणि त्याने थेबेजावर तळ देऊन त्याला धरिलें. ५१ परंतु त्या नगरांत एक मजबूत बुरूज होता, आणि सर्व पुरूष स्त्रियांसुध्दां म्हणजे त्या नगरांतलीं सर्व माणसें त्यांत पळून गेली. आणि आपल्या मागें बंदोबस्ती करून बुरजाच्या धाब्यावर चढले. ५२ नंतर अबीमेलेख त्या बुरजाजवळ येऊन त्यावर लढला, आणि बुरजाला आग लावून जाळायास त्याच्या दाराजवळ गेला. ५३ तेव्हां एका स्त्रीने अबीमेलेखाची टाळू फोडायास त्याच्या डोक्यावर जांत्याची वरली तळी टाकिली. ५४ तेव्हां त्याने घाई करून आपला हत्यारें वाहणारा जो तरूण त्याला हाक मारून सांगितलें, ''तूं आपली तरवार काढून मला जिवें मार, नाही तर मजविषयीं म्हणतील कीं बायकोने त्याला मारिलें.'' यास्तव त्याच्या तरण्याने त्याला भोसकिल्यावर तो मेला. ५५ मग अबीमेलेख मेला हें पाहून इस्त्राएली माणसें आपापल्या ठिकाणीं गेलीं. ५६ असी दुष्टाई जी अबीमेलेखाने आपल्या सत्तर भावांस जिवें मारण्याने आपल्या बापाविषयीं केली होती, ती देवाने त्याला उलटून लाविली. ५७ आणि शखेमांतल्या माणसांचीहि सर्व दुष्टाई देवाने त्यांच्या मस्तकावर उलटून लाविली; याप्रमाणें थरूब्बालाचा पुत्र योथाम याचा शाप त्यांस भोवला.