25
1 नंतर शूहीच्या बिल्ददने ईयोबला उत्तर दिले:
2 “देव राजा आहे.
प्रत्येकान देवाला मान दिला पाहिजे आणि त्याचे भय बाळगले पाहिजे.
देव त्याच्या स्वर्गीय राज्यात शांती राखतो.
3 कुठलाही माणूस त्याचे तारे\f + \fr 25:3 \fk त्याचे तारे किंवा“त्याचे सैन्य” याचा अर्थ देवाचे स्वर्गातील सैन्य.\f* मोजू शकत नाही.
देवाचा सूर्य सर्व लोकांवर उगवतो.
4 देवाशी तुलना करता कुठलाही माणूस चांगला नाही.
कुठलाही मनुष्याप्राणी पवित्र असणार नाही.
5 देवाला चंद्र सुध्दा तेजोमय आणि पवित्र वाटत नाही.
देवाच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत.
6 माणसे तर त्याच्या दृष्टीने पवित्रतेत खूपच कमी पडतात.
मनुष्यप्राणी एखाद्या अळीप्रमाणे (मँगाँट) आहे.
तो कवडीमोलाच्या जंतूप्रमाणे आहे.”