12
1 त्या वेळेला तू म्हणशील:
“परमेश्वरा, मी तुझे स्तवन करतो
तू माझ्यावर रागावला होतास
पण आता राग सोड
तुझ्या प्रेमाची प्रचिती दे.
2 देव माझा तारक आहे माझी त्याच्यावर श्रध्दा आहे.
मी निर्भय आहे तो मला तारतो.
परमेश्वर हीच माझी शक्तीआहे.
तो मला तारतो म्हणूनच मी त्याचे स्तुतिस्तोत्र गातो.”
3-4 तारणाच्या झऱ्यातून तुम्ही पाणी घ्या
म्हणजे सुखी व्हाल
आणि म्हणाल,
“परमेश्वराची स्तुती असो.
त्याच्या नावाची उपासना करा.
त्याच्या करणीची माहिती लोकांना सांगा.”
5 परमेश्वराचे स्तुतिस्तोत्र गा कारण
त्याने महान कार्य केले आहे.
देवबाद्दल ही वार्ता सर्व जगात
पसरवा सर्व लोकांना हे कळू द्या.
6 सीयोनवासीयांनो, तुम्ही गजर करा.
कारण इस्राएलचा एकमेव पवित्र देव समर्थपणे तुमच्यामध्ये आहे.